Ad will apear here
Next
पूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे!
मुलांनी लिहिली धीर देणारी पत्रे


पुणे :
‘घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. महापुरासारख्या संकटाला धीराने तोंड देत तुम्ही पुन्हा आयुष्य सुरू करत आहात, हे खूप प्रेरणादायी आहे....’ हे शब्द आहेत अक्षरनंदन शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त भागातील मुलांसाठी लिहिलेल्या पत्रांमधील.  (यातील काही पत्रांचे फोटो बातमीच्या शेवटी दिले आहेत.)

भीषण संकटातून सावरण्यासाठी मानसिक आधाराचीही तितकीच गरज असते, हे लक्षात घेऊन अक्षरनंदन शाळेतील दहावीच्या वर्गातील मुला-मुलींनी पूरग्रस्त भागातील मुलांना दिलासा देणारी ही पत्रे लिहिली आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या जनजीवनाची माहिती माध्यमांमधून पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी घेतली. अशा वेळी पूरग्रस्त भागातील मुले या संकटाला कशी तोंड देत असतील, या चिंतेने अक्षरनंदन शाळेतील मुलेही अस्वस्थ झाली होती. त्यांची ही अस्वस्थता, पूरग्रस्त भागातील आपल्यासारख्याच मुलांसाठी काही तरी करण्याची तळमळ त्यांच्या पत्रांतून व्यक्त झाली आहे. शाळेचे पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंची मदत पाठवली. त्याबरोबर ही पत्रेदेखील पाठवण्यात आली. 



पुरामुळे त्या भागातील मुलांची शाळा बंद असल्याने सुटी मिळाल्याचा आनंद होत असेल, याचा बालसुलभ आनंदही यातून दिसतो. त्याच वेळी, त्यांची वह्या, पुस्तके भिजली असतील, आता ती मुले अभ्यास कसा करतील, याची काळजीही आहे आणि त्यांना धीर देण्याची गरज असल्याची जाणीवही या मुलांना आहे, हेदेखील या पत्रांतील मजकुरातून दिसून येते. 

पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना ही पत्रे मिळाली असतील, तेव्हा नक्कीच त्यांना खूप आधार वाटला असेल. दूर शहरांमध्ये राहणारी मुले आपला विचार करत आहेत, आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, या विचाराने नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले असेल. पुन्हा शाळेत जाण्याच्या, अभ्यास करण्याच्या त्यांच्या इच्छेला या पत्रांमुळे नक्कीच पालवी फुटेल.  

स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जिणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

केशव मेश्राम यांची ही कविता पूर्वी अभ्यासक्रमात होती. या मुलांना त्या कवितेचा अर्थ खऱ्या अर्थाने उमगल्याची भावना व्यक्त होत आहे. 

















 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZTWCD
 अक्षर नंदन च्या विद्यार्थ्यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम केला आहे. सर्व पत्रे सुवाच्य आणि संवेनशीलतेने लिहिली आहेत. सर्व पत्रलेखकांना धन्यवाद1
 खुपच आश्वासक आणि मुलांच्या जाणिवा समृध्द करणारा उपक्रम

अक्षरनन्दन चे खुप कौतुक 🌿
Similar Posts
अतिवृष्टीबाधित जिल्हा परिषद शाळांसाठी ५७ कोटींचा निधी पुणे : ‘राज्यातील २१ जिल्ह्यांमधील दोन हजार १७७ जिल्हा परिषद शाळांना महापूराचा फटका बसला असून, त्यांची दुरुस्ती, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके व पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी शाळांना ५७ कोटींचा निधी आवश्यक असून, तो निधी तातडीने शिक्षण विभागाकडून खास बाब म्हणून देण्यात येईल,’ अशी घोषणा
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे पूरग्रस्तांसाठी ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू रवाना पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.
सारस्वत बँकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत पुणे : सहकार क्षेत्रातील अग्रणी सारस्वत बँकेतर्फे कोल्हापूर-सांगलीसह राज्याच्या इतर भागातील पुरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाचा मदतनिधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’स देण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक कोटी रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language